लोकसंख्या भाग 1 कारणे दया
प्रकरण 1- लोकसंख्या भाग 1
खालील विधांनाचे योग्य कारणे दया.
1) लोकसंख्या वितरण असमान असते.
2) भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
3) वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
4) लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात व्दितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते.
5) जन्मदर कमी असुनसुध्दा लोकसंख्या वाढू शकते
6) लोकंसख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
7) लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या पहील्या टप्प्यात लोकसख्या वाढ स्थिर असते.
1) लोकसंख्या वितरण असमान असते.
उत्तर- ① मानवी लोकसंख्येवर प्राकृतीक घटकांचा प्रभाव पडत असतो. प्राकृतीक घटक मानवी लोकसंख्येवर परिणाम करतात.
② मानवी जिवनास सुखकर असलेले प्राकृतिक घटक उदा. प्राकृतिक रचना, अल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेती योग्य सुपिक मृदा व मैदाने, या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणावर वितरीत झालेले नाहीत. ③ मानवी जिवनास प्रतिकुल असलेले घनदाट अरण्ये, दललदीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अति थंड व हिमाच्छादीत प्रदेश, असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते यांचे प्राकृतिक घटकांच्या असमान वितरणामुळे लोकसंख्या वितरण असमान आहे.
2) भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
उत्तर- लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन लोकसंख्या वाढीच्या स्थित्यंतरांचा अभ्यास लोकसंख्या संक्रमणात केला जात असतो.
① लोकसंख्या संक्रमणांच्या तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर व जन्मदर दोन्ही कमी झालेले असतात त्यामुळे लोकसंख्यावाढीचा दर कमी झालेला असतो. परंतु लोकसंख्या वाढतच असते. भारतात देखिल अशिच स्थिती आहे.
② लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या प्रगतीचा वेग वाढून नागरिकांचे उत्पन्न वाढलेले असते, भारताचा प्रगतीचा वेग वाढलेला आहे व गेल्या काही दशकात भारतीयांचे उत्पन्न वाढलेले आहे.
③ तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक सोयी सुविधा, व्दितीयक व तृतीयक व्यवसांचा विस्तार हे संक्रमणांच्या तिसऱ्या टप्प्यातील घटक ही भारतात पहावयास मिळत आहे.
④ भारतीय नागरीकांना कुटुंबनियोजनाचे महत्व पटल्याने भारतीय कुटूंबांचा आकार कमी होत आहे.
⑤ संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात पहावयास मिळणारे घटक भारतात आढळत असल्याने भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातुन जात आहे असे म्हणता येईल.
3) वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
उत्तर-
① सर्व प्रकारचे वाहतूक मार्ग जगाला जगाशी जोडतात त्यामुळे ते नेहमीच विकासासाठी आधारभुत असतात कोणत्याही प्रदेशात जाण्या- येण्यास सुलभता ही त्या प्रदेशातील लोकसंखेची घनता वाढवते.
② वाहतुक मार्ग एकत्र आलेल्या प्रदेशात व्यापार व उदयोग विषयक घटकांना चालना मिळते त्याच बरोबर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत असते.
③ सागरी वाहतुकीमुळे नवीन भूमीचा शोध व बंदराचा विकास होत असतो, सागरी वाहतुकीमुळे व्यापार वाढतो व रोजगार निर्मीती होते, बंदरे व गोंदीच्या समृध्दीतुन लोकवस्ती वाढत जाते.
④ रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या जाळे असणाऱ्या ठिकाणी बाजारपेंठाची निर्मीती होवुन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याने अशा ठिकाणी लोकवस्तीत वाढत जाते. उदा. मुबंई
⑤ रस्ते, रेल्वे, हवाई व जलवाहतुक ही पर्यटन व्यवसास चालना देतात व त्यातुन पर्यटन स्थळी लोकवस्ती वाढत जाते
4) लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात व्दितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते.
उत्तर- ① लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर व जन्म दर कमी झालेले असतात त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दरही कमी झालेला असतो.
② लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला असतो.
③ या टप्प्यात लोकांचे उत्पन्न वाढते ते उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पनापेक्षा जास्त असते.
④ या टप्प्यात गरीबी कमी होवुन, नागरिक त्यांचे जास्तीचे उत्पन्न मुलभुत गरजांच्या व्यतिरीक्त राहणीमान उंचावण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, अधिकच्या सोयी-सुविधा मिळविण्याठी खर्च करतात त्यामुळे आपोआप व्दितीयक व तृतीयक व्यवसायांना चालना मिळते व त्यातुनच या व्यवसायांची वाढ होते.
5) जन्मदर कमी असुनसुध्दा लोकसंख्या वाढू शकते.
उत्तर- ① जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशात जन्मदर कमी झाला तरी बऱ्राचकाळ लोकसंख्या वाढत असते.
② यापुर्वीच वाढलेली लोकसंख्या व तसेच वैदयकीय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे साथीच्या रोगांचा नायनाट झालेला असतो.
③ आरोग्या विषयी जागरुकता, शिक्षण, सामाजीक उन्नती यामुळे मृत्यूदरात झालेली घट झालेली असते
④ ही मृत्यूदरातील घट लोकसंख्या वाढीस उपयुक्तच असते.
⑤ प्रदेशातील शेती उत्पन्न, उदयोगातील इतर उत्पादने व स्थलांतर असे घटक मानवी गरजा पुर्ण करण्यास सक्षम असल्यास जन्मदर कमी असुनसुध्दा लोकसंख्या वाढू शकते.
●6) लोकंसख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
उत्तर- ① लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौ. कि. मी. प्रदेशात राहणारी लोकांची संख्या होय.
② लोकसख्यंची घनता मावन व जमीन यांचे एखादया प्रदेशातील गुणोत्तर असते.
③ एखादया प्रदेशात कमी क्षेत्रफळावर जास्त लोकसख्या राहत असते तेव्हा तेथे लोकसंख्या जास्त आहे असे म्हटले जाते उदा. मुबंई
④ या उलट जास्त क्षेत्रफळावर कमी लोकसंख्या आढळते तेव्हा तेथे लोकसंख्या घनता कमी आहे असे म्हटले जाते उदा. वाळंवटी प्रदेश किंवा महाराष्ट्रातील खेडे गाव म्हणजेच लोकसंख्येची घनता ही प्रदेशात राहणारी लोकसंख्या या घटका बरोबरच त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ यावर अवलंबुन असते.
7) लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या पहील्या टप्प्यात लोकसख्या वाढ स्थिर असते.
उत्तर- ① लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या पहील्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर जास्त असतात.
② या टप्प्यात प्रजनन दर जास्त व कुटुंब मोठी, इतर सोयी-सुविधांचा अभाव असल्याने जन्माला येणाऱ्या चे प्रमाण जास्त असते.
③ परंतु विज्ञान व तंत्रज्ञानाचा, वैदयकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा प्रार्दुभाव, गरीबी, कुपोषण यामुळे मृत्युपावणाऱ्या लोकांचे प्रमाणही जास्त असते.
④ त्यामुळे जवढे जन्माला येतात त्याच प्रमाणात इतरांचा मृत्यूही होत असतो अशा परीस्थितीमुळे लोकसंख्या वाढ स्थिर राहते.

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया
प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील टिपा लिहा
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. संपर्क- प्रा. मनोज देशमुख 9421680541
Loka sankya bhag 1 is very nice
good work
Nice
Good